तुळजापूर (प्रतिनिधी)- नगर परिषद तुळजापूर हद्दीतील सर्वे नं 207/2 भूखंड क्र. 28 च्या गुंठेवारी रद्द करण्यात आल्याने गुंठेवारी वाल्यांचे धाबे दणाणुन गेले.
या बाबतीत अधिक माहीती अशी की. नगर परिषद तुळजापूर हद्दीतील सर्वे नं 207/2 भूखंड क्र. 28 च्या गुंठेवारी बाबत तक्रार या कार्यालयास प्राप्त झाली आहे. सदर भूखंडाचे गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमित करणेसाठी दाखल केलेल्या कागदपत्रा बाबत व सदर तक्रारी बाबत आपला खुलासा संदर्भ क्र.03 अन्वये मागविण्यात आला असून अद्याप आपल्याकडून खुलासा सादर केलेला दिसून येत नाही. तरी संदर्भ क्र.04 अन्वये उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांनी सर्वे नं. 207/2 प्लॉट नं. 28 ची गुंठेवारी मोजणी झालेली दिसुन येत नाही. तसेच मोजणी करणेसाठीचा अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला दिसुन येत नाही. त्यामुळे मोजणी नकाशा पुरविता येत नाही. असे कळविले आहे. तरी संदर्भ क्र.01 अन्वये कार्यालया मार्फत दि.05/06/2024 जा.क्र.1260 / 2024 नगर परिषद हद्दीतील सर्वे क्र. 207/2 भूखंड क्र. 28 चे गुंठेवारी अधिनियम अंतर्गत सदर प्लॉट ची नियमितीकरण झालेले असुन सदर गुंठेवारी नियमितीकरण करणेकरिता असलेल्या नियम व अटींची पुर्तता होत नसल्याने सदर सर्वे क्र. 207/2 भूखंड क्र. 28 चे गुंठेवारी अंतर्गत या कार्यालयाचे संदर्भ क्र.01 अन्वये केलेले नियमितीकरण रद्द करण्यात येत आहे. तरी सर्वे क्र. 207/2 भूखंड क्र. 28 चे उपअधिक्षक भुमी अभिलेख तुळजापूर यांच्यामार्फत सदर जागेचा मोजणी नकाशा सादर केल्यास आपल्या भूखंडाचे गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरण बाबत उचित कार्यवाही करण्यात येईल. असे नगरपरीषदने काढले. सदरील तक्रार अर्ज अँड. अश्विनी घोरपडे दिला होता.