भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पखरूड येथे बुधवार दि.23 रोजी ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या महिती नुसार पखरूड येथील शेतकरी बापू रामहरी यादव(माळी) वय (38) हा आपल्या शेतामध्ये स्वतःच्या ट्रॅक्टरने शेणखत टाकत होता. शेण खताची ट्रॉली खाली केल्यानंतर तो हायड्रोलिकच्या व ट्रॉलीच्या मधील भागात कचरा साफ करत असताना अचानक ट्रॉली खाली आली व यामध्ये तो अडकला त्याच्या छातीला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेतीन ते चार च्या दरम्यान घडली. बापू हा परत येत नसल्याने त्याच्या पत्नीने शेतात जाऊन त्याचा शोध घेतला तर त्याला बापू हा ट्रॅक्टरच्या आणि हायड्रोलिकच्या मध्ये अडकलेला दिसला. त्यांने आरडाओरडा केला. त्यामुळे लोक गोळा झाली त्यांनी बापूला बाहेर काढले व त्याला तात्काळ ईट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरने त्याला मयत घोषित केले. शव विच्छेदन ईट प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्याच्या पाश्चात्य आई- वडील,पत्नी,तीन मुले असा परिवार बापू हा आपल्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्यावर रात्री पखरूड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.