कळंब (प्रतिनिधी)- कळंब  न्यायालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता नसल्याने वकील व पक्षकरांची तिकीट, बाँड आधी साहित्य खरेदीसाठी मोठी गैरसोय होत असून  याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे.

नेमून दिलेला मुद्रांक विक्रेता जर न्यायालयाच्या आवारात बसत नसेल तर त्याच्यावर तात्काळ  कारवाई करावीअशी मागणी  विधीज्ञ मंडळाने सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी यांनी उप नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक लातूर यांच्याकडे तक्रार केली आसुन  कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. बी.बी. साठे यांनी  दि. 21 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  कळंब न्यायालयाच्या आवारात नेमून दिलेला मुद्रांक विक्रेता बी. आर. साबळे हे गेल्या सहा ते सात वर्षापासून न्यायालयाच्या आवारात मुद्रांक विक्री करत नसून ते कळंब तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्री करत असतात तसेच बँकेचे नोटरी  बनवणे, शपथपत्रे बनवणे इतर कार्यालयाचे कामे करणे यात मुद्रांक विक्रेता बी. आर. साबळे यांचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे .  ते पाच रुपयाचे व दहा रुपयांचे टॅम्प टिकीट विक्री करण्यास काटकसर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कळंब न्यायालयातील सर्व विधी ज्ञानात त्रास सहन होत आहे तसेच न्यायालयामध्ये येणाऱ्या वयोवृद्ध पक्षकारांना देखील तिकीट उपलब्ध नसल्यामुळे त्रास होत आहे. तरी सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून त्याचा मुद्रांक विक्री पुरवठा बंद करावा अशी मागणी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष बी.बी. साठे यांनी केली

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी  चौधरी यांनी मागील सहा महिन्यापूर्वी निवेदन दिले होते परंतु त्यांनी या निवेदनावर वरिष्ठांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे . त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  दुय्यक निबंधक कार्यालय कळंब येथे माझ्या पक्षकाराने नकलेसाठी तिकीट मागणी केली असता 120 रुपयाचे तिकिटाची आवश्यकता होती त्यामुळे विक्रेता बी. आर.  साबळे यांनी माझ्याकडे 120 रुपयाचे ऐवजी  60 रुपयाचे तिकीट दिले त्यांनी मला 120 रुपयाचे तिकिटाची गरज असल्याचे सांगितले असतानाही त्यांनी मला केवळ तुम्हाला दिलेल्या तिकिटावर दुय्यक निबंध कार्यालयात तीन नकला निघतात असे उत्तर दिले त्यानंतर मी त्यांना सांगितले की मला आणखी तिकिटाची गरज आहे असे सांगितल्यानंतर ही माझ्याकडे तिकीट नाहीत बाहेरून पहा तुम्ही तुमचे काम करा असे मला अर्वाच्य भाषा वापरून अपमानित केले आहे . मुद्रांक विक्रेता साबळे यांनी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक अधिकारी धाराशिव यांनी कळंब न्यायालयाच्या आवारात बसून मुद्रांक विक्री करण्याच्या आदेश दिले असतानाही ते स्वतःची मनमानी करत आहेत ते वकिलांना व पक्षकारांना उर्मट भाषा वापरून सतत त्यांचा अपमान केला जात आहे .  अशा मुद्रांक विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांनी अधिकाऱ्याकडे केली होती. मुद्रांक विक्रेत्याची पाठराखण दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी कोण करतय असा सवाल ही त्यांनी केला आहे. 




संबंधित बाँन्ड विक्रेता साबळे यांना आम्ही पत्राद्वारे कळवले आहे की आपल्याला नेमून दिलेल्या जागी आपण बॉन्ड विक्री करावी असे न आढळून आल्यास किंवा आपल्या तक्रारी पुन्हा प्राप्त झाल्यासआपणा विरुद्ध आपला परवाना रद्द का करण्यात येऊ नये असा अहवाल वरिष्ठाकडे तात्काळ पाठवला जाणार आहे. 

-  विशाल गाते 

रजिस्ट्रार दुय्यक निबंध कार्यालय कळंब.

 
Top