भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंबी येथील कुलदीप कचरू आंबेकर याचा ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटी लंडन येथे एज्युकेशन पॉलिसी अँड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या डिग्री साठी सिलेक्शन झाल्याने त्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे व माजी नगराध्यक्षा संयोगिताताई गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला. व त्यांना परदेशातील पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान आंबेकर बंधूंच्या वतीने कुलदीप आंबेकर व जयेश आंबेकर अध्यक्ष सचिव असलेल्या डेव्हलपिंग अँड संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दहा वर्षापासून फूड स्कॉलरशिप विनामूल्य पुरवठा करतात सध्या त्यांच्या माध्यमातून 700 विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून शाळा कॉलेज असलेल्या जाग्यावर विनामूल्य डबे पोहोचवण्याचे काम केले जात आहे हे त्यांचे कार्य वखाण्याजोगे असल्याचे माजी नगराध्यक्ष गाढवे यांनी यावेळी सांगितले व ग्राम विस्तार अधिकारी मेघराज गायकवाड यांचे पुतणे असल्याने त्यांचेही कौतुक यांनी केले.

या सत्काराप्रसंगी मेघराज गायकवाड, आर के सुकाळे सर, ए.के गायकवाड सर, विनायक मस्के प्रा. यु.जी तिजारे सर, प्रदीप चंदनशिवे, प्रा. राजाभाऊ बनसोडे, दत्तात्रय पालके, राजाभाऊ श्रीरंग बनसोडे, बापू सोनवणे, के एन थोरात, दत्तात्रेय पाटोळे, सुनील थोरात, मुकुंद लगाडे, धम्मदीप शिंदे यांच्यासह सत्कार मूर्तीचे वडील कचरू आंबेकर, वंदना आंबेकर, अर्चना आंबेकर, जयेश आंबेकर, ऋतुजा आंबेकर डॉ. श्रुती आंबेकर या परिवारासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top