तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील संत श्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्ताने एकादशी मुळे प्रत्येक दिंड्यांचे नगर प्रदक्षिणा झाली. दि. 24 एप्रिलला पहाटे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे, दत्तात्रय मुळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी साहेबराव सौदागर, तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, डॉ प्रा.गुरुप्रसाद चिवटे, राहुल गायकवाड,अशिष माळी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने यात्रेनिमित्त भाविक भक्त यांना पाच हजार लिटर ताकाचे वाटप करण्यात आले.रचना कंन्ट्रक्शन कंपनी लि.यांच्या वतीने यात्रेनिमित्त भाविक भक्त यांना विस हजार राजगिरा लाडुचे व विस हजार पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात आले.