तेर (प्रतिनिधी)- तेर येथील श्री संत गोरोबा काका यांची वार्षिक यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे यांनी केले.  

धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त नियोजन बैठक तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रशासक रूपाली कोरे बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार,ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड,ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गुरूबस शेटे, प्राथमिक आरोग्य केंद्र जागजीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शाम पाटील,तेरणा धरणाचे शाखा अभियंता धनराज वरपे,तेरचे तलाठी प्रशांत देशमुख,सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ओंकार जोशी आदी अधिकारी उपस्थित होते.यावेळी निरीक्षक अतुल नळणीकर,साहेबराव सौदागर ,व्यंकटराव माळी, हनुमंत कोळपे,नवनाथ नाईकवाडी,महादेव खटावकर, गणेश फंड, सुधाकर बुकन,नवनाथ पसारे,नामदेव कांबळे, राजाभाऊ आंधळे, अमोल सावंत,तेर बिटचे बिट अंमलदार प्रदिप मुरळीकर, पोलिस पाटील फातिमा मनियार,तानाजी पिंपळे, केशव सलगर, गोरख माळी, विजयकुमार खांडेकर,रतन नाईकवाडी,अभिमान रसाळ, धनंजय आंधळे, विवेकानंद नाईकवाडी,दैवशाला भोरे, कविता आंधळे व नागरिक उपस्थित होते.

श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त नियोजन बैठकीस उपस्थित नसलेले जिल्हा परिषद बांधकाम विभाग,एस.टी.महामंडळाचे संबंधित अधिकारी गैरसमज असल्यामुळे कायदेशीर कारवाई  करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी यावेळी सांगितले.

 
Top