कळंब. (प्रतिनिधी)-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव समिती कळंब २०२५ विचार संवर्धन महोत्सव अंतर्गत पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन शुक्रवार दिनांक ११ आणि शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी नगरपरिषद संस्कृती सभागृह मेन रोड कळंब येथे संपन्न होत आहे यानिमित्त संमेलनाची पूर्वतयारी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर बालोद्यान ज्येष्ठांसाठी विरूंगुळा केंद्र कळंब येथे घेण्यात आली या बैठकीत संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. संजय कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष ऍड ,त्रिंबकराव मनगिरे, महादेव महाराज अडसूळ , सी .आर .घाडगे. रमेश बोर्डेकर, डॉ. रामकृष्ण लोंढे,किशोर वाघमारे, विशाल वाघमारे, प्रा.रघुनाथ घाडगे , संतोष भोजने ,प्रा. जगताप, सतपाल बनसोडे, प्रा.जालिंदर लोहकरे, आश्रुबा कोठावळे,राजाभाऊ गायकवाड,महमंद चाऊस, भास्कर राव सोनवणे,यांनी आपले विचार व्यक्त केले सूत्रसंचालन सचिन क्षिरसागर यांनी तर आभार माधवसिंग  राजपूत यांनी मांनले.


 
Top