तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत पीएमश्री योजनेअंतर्गत स्पेशल इक्विटी प्रोजेक्ट द्वारे मेडिकल असेसमेंट करिता विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांना वैद्यकीय निदान या स्वरूपात उपलब्ध रक्कम वाटप करण्यात आली. पीएमश्री योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून स्पेशल इक्विटी प्रोजेक्ट द्वारे शाळेतील विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शहा तय्यबअली यांच्या हस्ते रकमेचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. रक्कम वाटप केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोहम्मद हुसेन वसीम शेख इयत्ता चौथी, आलिया युनूस सय्यद इयत्ता पाचवी , खुजरा रियाजोद्दीन मुलानी इयत्ता दुसरी या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.