कळंब (प्रतिनिधी)- कळंब रेल्वे कृती समितीची बैठक दि. 23 एप्रिल रोजी घेण्यात आली. या वेळी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यातील निरपराध नागरिकांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला. शहीद झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण ृदांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या नातेवाईकांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. 

रेल्वे कृती समिती ची ही दुसरी बैठक होती. मागील बैठकी नंतर आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती जसे की रेल्वे संदर्भातील अधिकारी, सल्लागार यांच्या भेटी, पत्रव्यवहार इ ची माहिती डॉ रामकृष्ण लोंढे यांनी दिली. धाराशिव-बीड- छ संभाजी नगर नवीन रेल्वे मार्गाचे अंतिम सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असुन मिळालेल्या माहितीनुसार हवाई सर्वेक्षण (एअर सर्व्हे ) झाले असून लवकरच जमीनीवरील सर्वेक्षण सुरू होणार आहे. तसेच या नव्या रेल्वे लाईन वर कळंब रेल्वे स्थानक होणार असल्याची पण माहिती मिळत आहे.

वेळोवेळी रेल्वे संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी पदाधिकारी निवडण्यात आले. यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सल्लागार म्हणून ॲड . त्र्यंबक मनगिरे, प्रा संजय कांबळे , अध्यक्ष म्हणून डॉ रामकृष्ण लोंढे, सचिव ॲड . मनोज चोंदे, सह सचिव डॉ अमीत पाटील, उपाध्यक्ष मुसदीक काझी व महादेव आडसुळ, कोषाध्यक्ष विलासराव करंजकर, प्रसिद्धी प्रमुख माधवसिंह रजपूत, सदस्य म्हणून प्रकाश भडंगे, बंडू ताटे, तुळशीराम माळी, संतोष भोजणे, सी आर घाडगे , यशवंत हौसलमल, सुरेश टेकाळे, आदी.

 
Top