कळंंब (प्रतिनिधी)- दक्षिण काश्मीरमधील पहेलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या केलेल्या भ्याड हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघ कळंब व सकल कळंबकर नागरिकांनी दिनांक 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.00 वाजता कळंब शहरातून कॅन्डल मार्च काढला यावेळी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला व घोषणा देण्यात आल्या या मार्च मध्ये सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग होता कॅण्डल मार्चला हुतात्मा स्मृती स्तंभ नगरपरिषद कार्यालया समोरून सुरुवात झाली अहिल्याबाई होळकर चौक, मेनरोड, सराफालाईन , डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्गे हुतात्मा व स्मृतीस्तंभ येथे पोहोचल्यानंतर पहेलगाम येथे अतिरेक्याने केलेल्या अमानुष गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक नागरिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून पुष्पअर्पण करून मेणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व राष्ट्रगीत गायन केले या कॅण्डल मार्चमध्ये महादेव महाराज अडसूळ, प्रा. डॉ. संजय कांबळे, मुसादेक काझी, अतुल गायकवाड, रवी नरहिरे, मकरंद पाटील, प्रकाश भडंगे, ऍड, त्रंबकराव मनगिरे, सतपाल बनसोडे,माधवसिंग राजपूत, भिकचंद लोढा, सुरेश टेकाळे,बाळासाहेब कथले, यश सुराणा, मंगेश यादव, प्रदीप यादव, संदीप कोकाटे, अशोक चोंदे, निर्भय घुले,पद्माकर माने,सचिन क्षिरसागर, श्रीकांत कुलकर्णी, शिवाजी गीड्डे, सतीश खिंवसरा , राजेंद्र बिक्कड, मकसूद शिकलगार ,अनिस बद्रुद्दीन शेख,ज्योती सपाटे, संगीता पांचाळ, सलमा सौदागर, दत्ता गायकवाड, टी. जी. माळी ,यशवंत हौसलमल,संतोष भांडे, अमन शेख, वाजेद तांबोळी, बशीर पठाण,पांडुरंग माळवदे, बापू भंडारे, बबनराव वाघमारे, बाळासाहेब हौसलमल यांच्यासह नागरिकांचा समावेश होता