भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरातील प्रमुख रस्त्यावर एक लघुशंकेसाठी स्वच्छतागृह सोडली. तर शहरातील प्रमुख बाजारपेठेत एकही मुतारी नसल्याचे समोर आले आहे. परंडा रोड वरील ग्रंथालया समोरील सार्वजनिक मुतारी असून शहरातील प्रमुख बाजारपेठेत गोलाई, ते नगर रोड,पार्टी रोड ,वेताळ रोड ,एसटी स्टँड ते नगर रोड आशा ठिकाणी व मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी नगरपरिषद मार्फत स्वच्छतागृह कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने बाजारपेठेतील येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठेत स्वच्छतागृह उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. 

तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या शहरात फक्त याच ठिकाणी शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाच्या बाजूला,गांधी चौक येथे लघुशंकेसाठी नगरपरिषदेमार्फत स्वच्छतागृह आहे. मात्र प्रमुख बाजारपेठेतील काही ठिकाणी नागरिकांना व महिलांना शौचालयात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे .नागरिकासह महिलांना होत आहे .त्यासाठी प्रमुख बाजारपेठेमध्ये व नगरपरिषद यांनी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .भूम शहर हे उपविभाग म्हणून ओळखले जाते .या शहरात सर्व विभागाचे उपविभागीय कार्यालय आहेत .त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना महिलांना कामानिमित्त शहरात यावे लागते .व खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये जावे लागते. मात्र नगरपरिषद कडून प्रमुख बाजारपेठेत कसल्याही प्रकारचे सुलभ शौचालयाची सोय करण्यात आलेले नाही .


तालुक्यातील महिला त्यांच्या कामानिमित्त शहरात येतात .व बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी यावे लागते.परंतु प्रमुख कार्यालय व बाजारपेठ असणाऱ्या ठिकाणी कुठेही महिलांसाठी सुलभ सौचालय बांधण्यात आलेले नाही .त्यामुळे महिलांचे गैरसोय होते.

संतोष सुपेकर

भाजपा तालुकाध्यक्ष.

 
Top