धाराशिव (प्रतिनिधी)-भारत देशाचे कणखर व यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवण्यासाठी आदिवासी शबरी महामंडळाच्या माध्यमातून धाराशिव येथील आदिवासी बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजूर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे यांनी राज्यातील महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
“राज्य सरकारने आदिवासी समाजाच्या गरजा ओळखून, त्यांच्या निवाऱ्याच्या मूलभूत हक्कासाठी पुढाकार घेत मोठ्या प्रमाणात घरकुल योजना मंजूर केली आहे. ही पावले आदिवासींच्या जीवनमानात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडवतील. त्यामुळे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व संबंधित विभागाचे मनःपूर्वक आभार मानतो,“ असे नितीन काळे यांनी म्हटले आहे.
महामंडळाच्या वतीने ही घरे तातडीने आणि पारदर्शकपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत असून, या निर्णयामुळे अनेक आदिवासी कुटुंबांना हक्काचे छप्पर मिळणार आहे.
नितीन काळे यांनी पुढे सांगितले की, “ही केवळ सुरुवात असून, महामंडळ पुढील काळातही अशाच विकासात्मक उपक्रमांद्वारे आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्यातील महायुती सरकार कटिबद्ध आहे.“यावेळी मागील सरकारने आदिवासींच्या विकासाच्या केवळ घोषणा करून आदिवासी समाज बांधवाची प्रचंड मोठ्या प्रमाणात अवहेलना व दिशाभूल केलेली आहे. परंतु महायुती सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे सरकार आहे. दीन दलित,गोरगरीब, अनाथ, अपंगाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारा हे सरकार आहे. धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी पारधी समाज बांधवांसाठी 395 घरकुल मंजूर करून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली, ही अतिशय आनंदाची बाब असून सर्व समाज बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. या पुढील काळातही राज्यातील महायुती सरकार धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची घोषणा यावेळी श्री नितीन काळे दिली. यावेळी आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, दत्ता पेठे, दादा पवार, बापू पवार, पंजाभाऊ पवार, यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.