भूम (प्रतिनिधी) - परंडा येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभादरम्यान हृदयद्रावक घटना घडली. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात भाषण करताना वर्षा खरात या विद्यार्थिनीला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन कोसळली. तातडीने तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. विशेष म्हणजे हा पूर्ण कार्यक्रम लाईव्ह असल्यामुळे हे सर्व चित्रीत झाले आहे. 

वर्षा खरात ही रा.गे. शिंदे महाविद्यालयात विज्ञान शाखेत तिसऱ्या वर्षांचे पदवीचे शिक्षण घेत होती. घेत होती. महाविद्यालयात निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी भाषण करताना वर्षा खरात हिने एक-दोन किस्से सांगून उपस्थितींना हसवले. त्यानंतर काही मिनिटातच ती कोसळली. या हदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 
Top