तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील गंधोरा येथील पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाकडुन महिलेस झालेल्या मारहाणीचा निषेध करुन संबंधितावर कठोर कारवाई  करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितपवारगट) तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी व शिवसेना नेते योगेश केदार यांनी केली.

या प्रकरणी बोलताना केदार म्हणाले कि, एका धनगर समाजातील महिलेला पवनचक्की सुरक्षा रक्षकाकडून झालेल्या मारहाणीचा तसेच तक्रार न घेणाऱ्या पोलिसांचा मी जाहीर निषेध करतो. या प्रकरणी मी या धनगर माताभगिनी सोबत न्याय मिळेपर्यत सोबत राहणार असल्याचे यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे सुर्यवंशी म्हणाले कि, या पवनचक्की कंपनीच्या महिलेला मारहाण करण्यापर्यत मजल गेली असुनही दादागिरी बंद करा. शेतकऱ्यांच्या जमिनी घ्या पण योग्य मोबदला द्या, पवनचक्की कंपन्यांनी गुंड पाळले असुन  यातील जखमी नवरा बायकोस दलाल मंडळी जावुन भिती दाखवत आहेत.  या प्रकरणी संबंधित मारहाण करणारे व त्यांना आदेश देणाऱ्यावर कारवाई न,केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सुर्यवंशी यांनी दिला आहे.


 
Top