धाराशिव (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक महादेव शिंदे सरांच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वयंशासन दिनानिमित्त शाळेस स्मार्ट टीव्ही भेट दिला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनमंत दासमे, उपाध्यक्ष कुंभार, ग्रामपंचायत सदस्य अनंत भोसले, शाळेचे मुख्याध्यापक महादेव शिंदे, वर्गशिक्षक धर्मराज भोसले, चंद्रशेखर कांबळे, बालाजी गायकवाड, तानाजी कांबळे हे शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थी व वर्गशिक्षक भोसले यांंनी शाळेचे मुख्याध्यापक श्री महादेव शिंदे यांच्याकडे हा टीव्ही सुपूर्द केला. हा टीव्ही भेट देऊन विद्यार्थ्यांनी एक शाळेसोबत छान आठवण जोडली आहे. गेली आठ वर्ष हे विद्यार्थी या शाळेमध्ये बागडले आहेत. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती या उक्तीप्रमाणे त्यांनी छोटीशी भेट शाळेला दिली आहे शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी पालक उपस्थित होते.