धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेल्या मराठवाड्यातील एकमेव अग्रनामांकित उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची यशस्वी घौडदौड कायम आहे. बँकेने 31 मार्च अखेर 3 हजार 145 कोटी रूपयाचा बँकींग व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. बँकेने सलग तिसऱ्या वर्षीही नेट एनपीए झिरो टक्के ठेवण्यात यश मिळविले आहे. मार्च अखेर बँकेस इतिहासात सर्वोच्च असा 45 कोटी 7 लाख रूपयाचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांनी दिली.
उस्मानाबाद जनता सहकारी बँक 1933 पासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असून, बँकेस 92 वर्षाची परंपरा आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रात मंदिची लाट, गुंतवणुकीवरील व्याज दरामध्ये सातत्याने घट अशी स्थिती असताना देखील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने विद्यमान चेअरमन नागदे यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक प्रगतीमध्ये सातत्य ठेवले आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या महाराष्ट्रात 28 तरे कर्नाटक राज्यात 2 अशा एकूण 30 शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीसह 14 स्वमालकीच्या जागा आहेत. आय. एम. पी. एस. आदी अद्यावत सुविधासह कोअर बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना जलद सेवा देण्यात बँक अग्रेसर आहे. 31 मार्च अखेर बँकेचे भागभांडवल 79 कोटी 68 लाख रूपये, ठेवी 1 हजार 874 कोटी 68 लाख, कर्ज 1 हजार 270 कोटी 11 लाख, गुंतवणक 830 कोटी 9 लाख तर बीडीडीआर निधी 314 कोटी 50 लाख रूपयापर्यंत वाढला आहे.
बँकेच्या संचालक मंडळाने एक पथदर्शी धोरण समोर ठेवून वाटचाल केल्यामुळे बँकेच्या प्रगतीत लक्षणीय वाढ झाली आहे. बँकेचे अध्यक्ष नागदे, उपाध्यक्ष वैजीनाथ शिंदे, सर्व संचालक मंडळ , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके, बँकेचे अधिकारी व बँकेचे सर्व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे बँकेला ही प्रगती साधता आली.