तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती सोमवार दि. 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. आज आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी दिवसभर आंबेडकर प्रेमीची रिघ लागली होती. भीमजयंती निमित्त भिमगीतांचा कार्यक्रम रक्तदान, अन्नदान, मिठाई वाटप असे समाजपयोगी उपक्रम घेण्यात आले.
आज आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी मंञी मधुकर चव्हाण, पोनि अण्णासाहेब मांजरे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक अमर मगर, युवा नेते रुषी मगर, अमोल कुतवळ, श्रीकृष्ण सुर्यवंशी, आनंद कंदले, मिलींद रोकडे, तानाजी कदम, औदुंबर कदम, श्रीकांत कदम, ज्ञानेश्वर गवळी, सुरज बागल, सचिन ठेले, संजय खुरुद सह राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवार पहाटे पासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर रिघ लागली होती. महिलांची संख्या लक्षणीय होती.