धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव प्रशाला धाराशिव येथे विश्वरत्न,बोधिसत्व, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

.यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पंडित जाधव स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण माडेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी मोहन सुरवसे, बाळासाहेब इसाके, जयश्री भोसले, मीना गव्हाणे, दिपाली रोकडे, रामेश्वर चव्हाण, सज्जन करळे, तानाजी आदटराव, पांडूरग देशमुख, निलावती झोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमण जाधव यांनी केले.

 
Top