धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे शासकीय विश्रामगृह अखिल भारतीय छावा संघटनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांनी मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंती निमित्त आणि येणाऱ्या काळात छावा संघटनेचा मागील वर्षभराचा आढावा बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच छावा संघटना निर्माते स्व. आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या कार्याला प्रेरित होऊन आज प्रहार जनशक्ती पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजकन्या जावळे पाटील यांनी छावा संघटनेत प्रवेश केला.तसेच त्यांना महिला मराठवाडा उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.तसेच, मनीषा काकासाहेब जगताप यांची नेमणूक धाराशिव तालुका महिला उपाध्यक्ष ,गणेश अंधारे धाराशिव तालुका उपाध्यक्ष,
अभिजीत अनिल लोमटे धाराशिव तालुका शेतकरी आघाडी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. या बैठकीचे सूत्रसंचालन धाराशिव छावा जिल्हा संपर्कप्रमुख तथा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी केले.या बैठकीला जिल्हा सचिव ज्योतीराम काळे, जिल्हा कार्याध्यक्ष रोहित पाटील, धाराशिव शहराध्यक्ष प्रशांत पवार, धाराशिव तालुका संपर्कप्रमुख लहु शिंदे, धाराशिव तालुका विद्यार्थी आघाडी प्रमुख विक्रम जाधव ,कळंम तालुका अध्यक्ष विठ्ठल यादव, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख नानासाहेब गुंड, सुजित मुळे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार जिल्हा संघटक अमोल गोरे यांनी मानले.
तसेच वडगाव (सि.)येथील सक्रिय झुंजार छावा नवज्योत पाटील यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या बैठकीला छावा धाराशिव संघटनेचे पदाधिकारी आणि शेकडो छावे उपस्थित होते.