तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथील विद्यार्थी यांनी मंथन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थी यांचा प्रशालेत सत्कार करण्यात आला.

नम्रता मोहन भोंडवे ,हरिओम गोविंद माने, अमृता तानाजी जाधव, वीर अप्पा कोकरे, स्वरा शिवाजी जाधव, नंदिनी नागनाथ देवकते, संस्कृती अमर कोळपे, आदिती लक्ष्मण झिंजे, गायत्री संतोष खटिंग, जान्हवी चंद्रकांत कोळपे ,रविराज रामा देवकते ,सिद्धी बालाजी सुतार या विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत यश  संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना आर.एन.हलसीकर यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापिका सुलभा पवार,संतोष देशपांडे,गणपती यरकळ,शशिकांत देशमुख, गोरख चौरे, चंद्रकांत गिरे, उषा नाईक,वर्षा शेजाळ, प्रभावती मुंढे, लता बंडगर, रोहिणी हलसीकर, शकुंतला पांचाळ उपस्थित होते.

 
Top