धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे आज दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोषयांनी कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक या दोन्ही जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. यावेळी नवोदय प्रवेशित विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कारासाठी सीईओ मैनाक घोष यांनी स्वतः हून पुढाकार घेतला.

यावेळी शिक्षणाधिकारी अशोक पाटील व कार्यालयीन विस्ताराधिकारी दत्तप्रसाद जंगम उपस्थिती होते. यावेळी सातवीतील मुलींनी संविधानाची विविध कलमे सांगितली. धनश्री बालाजी जमाले या विद्यार्थीनीने संविधानातील सर्व कलमे म्हणून दाखवली शिक्षक संजय देशटवाड यांनी वाचनालयाची कार्यपद्धती समजून सांगितली. त्यानंतर पाचवी स्पर्धा परीक्षेच्या वर्गाला भेट देऊन त्या ठिकाणी विद्यार्थिनींची संवाद साधला. यावेळी दोन्ही शाळेच्या वतीने संविधानाची प्रत भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व विस्ताराधिकारी यांचा सन्मान प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय मगर,कन्या शाळा मुख्याध्यापक रहिमान सय्यद शाळा समिती अध्यक्ष अमोल पवार, सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळेत परिसराची पहाणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या स्मारकाला भेट दिली.तेथील माहिती  घेतली. प्रास्ताविक  जगन्नाथ धायगुडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण गाडे तर आभार बाळासाहेब जमाले यांनी मानले.

 
Top