मुरूम ( प्रतिनीधी)- श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त मुरूम शहरातील श्री हनुमान मंदिरात सायंकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाला. मंदिर समितीच्या वतीने पाटील यांचा येतोचित्त सत्कार करण्यात आला. यावेळी व्यंकट जाधव,डॉ.राधाकृष्ण डागा,ऍड उदय वैद्य, शिवशंकर ब्याळे, अशोक मिणियार,गोविंद पाटील,दामोदर काबरा,श्रीकांत बेंडकाळे, राजू भोसगे,आकाश भोसगे, मल्लिनाथ भोसगे, श्रीराम कुलकर्णी, सिद्राम बालकुंदे, गोबिंद कौलकर,रणजित राजपूत,मल्लिकार्जुन बदोले,कलय्या स्वामी, चंद्रकांत कुलकर्णी आदीसह श्री हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्री हनुमान मंदिरास श्रीराम कुलकर्णी यांच्या पुढाकाराने क्रेनच्या साह्याने फुलांनी सजविण्यात आले होते व त्याचबरोबर चंद्रकांत कुलकर्णी यांनी श्री हनुमान मंदिरास चांदीचे दागिने भेट दिली त्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांचा येतोचित्त सत्कार केला. मंदिर समितीच्या वतीने आज पासून पाच दिवस श्री हनुमान पालखीचे दररोज रात्री मंदिरास प्रदक्षिणा घातली जागे, श्री हनुमान जन्मोत्सवच्या पाचव्या दिवशी समितीच्या वतीने प्रतिवर्षी छबिना पालखीचे ग्रामप्रदक्षिणा घालून यात्रेचे सांगता संपन्न होते.

 
Top