धाराशिव (प्रतिनिधी)- फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आकर्षक अशा देखाव्याचे सादरीकरण केले जाते,गेल्या वर्षी तथागत गौतम बुद्ध गुफाचे सादरीकरण करण्यात आले होते,यावर्षी महाड येथील पाण्याचा सत्याग्रह,झोपडी (कुटी),तथागत गौतम बुद्ध यांची सुंदर अशी मुर्ती,हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असुन यशराज पब्लिक स्कूल या शाळेने विद्यार्थ्यांच्या सहलीतुन भेट दिली असता प्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आकर्षक अशा देखाव्याची पाहणी केली.कडक उन्हाळा जाणवत असल्याने प्राचार्य रेखाताई जेवळीकर यांनी नगर परिषदेतील सफाई कामगार यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून थंड अशा वाॅटर बॅग व टोपीचे वाटप केले. समितीच्या वतीने प्राचार्य रेखाताई जेवळीकर यांचा शाल व पुष्प देऊन डॉ.तानाजी लाकाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व त्यांचे सहकारी स्टाफ कर्मचारी यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,आलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य शिबिरात डोळे तपासणी करण्यात आली. शिक्षक जयवंत ओमने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील काही घटनेचे विचार मांडले, यावेळी शाळेचे मॅडम,आदिती जोशी पल्लवी सुरवसे,मेघा सलगर ,प्रणिता गरड,प्राची खेर्डेकर,सुभद्रा गायकवाड,स्नेहा भुतेकर, सुनंदा बंडगर,मेघा मेटकरी, जयवंत ओमने,बालाजी गरड सह फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.यशराज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा देखाव्यास भेट दिल्याबद्दल समितीच्या वतीने गणेश वाघमारे यांनी आभार मानले.