धाराशिव - (प्रतिनिधी)- मराठी नववर्षानिमित्त  धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन महाकवी कालिदास यांची अजरामर कलाकृती शाकुंतल या नाटकाचे  13 /'4/25  रविवारी रोजी आयोजन करत आहे. नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात इथे हे नाटक सादर होणार आहे.

पुणे येथील मराठी भाषा संवर्धन मंडळ निर्मित या शाकुंतल नाटकाचा मराठी अनुवाद / रंगावृत्ती गणेश दिघे यांनी केलेला आहे, तसेच अनिकेत अदिनाथ नेमाने यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलेले आहे. प्रमुख भुमिकेत शुभम मारडकर,समृद्धी भोसले, युक्ता नाईक, प्रतिक्षा कदम,पराग जगताप यांच्या आहेत.धाराशिवच्या प्रा. माया मुळे या नाटकाच्या संयोजिका आहेत. धाराशिवची कन्या श्वेता आनंद कुलकर्णी ही पण या नाटकात छोटी भूमिका साकारत आहे. तरी सर्व धाराशिव शहरातील रसिकांनी या नाटकाचा आनंद घ्यावा, असे  आवाहन धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन कार्यकारिणी करत आहे. तिकीट दर 500 रु / 200 रु/ 150 रु असे आहेत. तिकिटासाठी संपर्क -9049489946 व  9423342097 करावा.

 
Top