भूम (प्रतिनिधी)- सालाबाद प्रमाणे यावर्षीही भूम शहरातील कसबा विभागातील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे. राम जन्मोत्सव काळात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज चार ते सहा महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम तर संध्याकाळी सात वाजता राम रक्षा उपासना व आरती व नंतर रात्री साडेनऊ ते साडे अकरा पर्यंत पुरुष भजनी मंडळाचे भजन, दिनांक 9 एप्रिल रोजी श्रीराम जन्माचे किर्तन हभप अमित महाराज जोशीयांचे होईल. संध्याकाळी पालखीतून श्रीची मिरवणूक निघेल. दिनांक 7 एप्रिल रोजी श्री गुरुदेव दत्त अनाथ मुलांची वारकरी संस्था बार्शी यांचा कार्यक्रम राहील व नंतर रात्री हभप सोमनाथ महाराज बाबर यांचे कीर्तन होईल. दिनांक 8 एप्रिल रोजी सीता स्वयंवर किर्तन हभप श्रीराम महाराज जोशी केज यांचे होईल व रात्रीचे विना मिरवणूक निघेल. दिनांक 9 एप्रिल रोजी हभप संभाजी महाराज गाडे यांचे कीर्तन होईल. दिनांक 10 एप्रिल रोजी गीत रामायण अनिल ताटके आणि ग्रुप बोरीवली सायंकाळी पाच वाजता होईल. दिनांक 11 एप्रिल रोजी हभप सदाशिव महाराज झणझणे यांचे कीर्तन होईल. तर दिनांक 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव होईल नंतर रात्री हभप सिद्धेश्वर महाराज गाडे यांचे कीर्तन होईल. दिनांक 12 एप्रिल रोजी आरती व महाप्रसाद होईल. त्याच दिवशी भव्य रक्तदान शिबिर होणार आहे व रात्री हरिजागर होऊन कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान कसबा भूम सुधीर देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.