धाराशिव (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिवच्या मुख्य बाजार आवारात स्वच्छ बाजार आवार अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ दि. 24 एप्रिल रोजी सहाय्यक निबंधक धनाजी काळे, सभापती राजेंद्र बाळासाहेब पाटील, उपसभापती शेषेराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनेनुसार कार्यक्रम राबविण्यात आला. त्यावेळी सर्व संचालक व समितीचे सचिव एस डी माने सर्व आडते व्यापारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.