परंडा (प्रतिनिधी) - येथील धम्मराजिका महाविहार येथे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न झाले परिवर्तन मिशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर भगत सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आजच्या तरुण पिढी या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांनी शिक्षण घेऊन कशाप्रकारे आंबेडकरवाद कसा पुढे घेऊन जाऊ शकतो यावर सखोल मार्गदर्शन केले.
तसेच देश-विदेशात शैक्षणिक संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन करून आजच्या तरुण पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. येणाऱ्या काळात बहुजनांची मुलं शैक्षणिक पात्रात देश-विदेशात मोठी संधी असून त्यांना कशाप्रकारे विदेशी शिष्यवृत्ती मिळवून त्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. या कामी मी केव्हाही आपल्या सेवेत आहे असेही जाहीर केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकाळजे, दीपक पवार, महेश कसबे, जिनेरी, सीमा निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी बनसोडे, प्रदीप परिहार, जीवन दीपक पवार, कुणाल बनसोडे इत्यादी ने परिश्रम घेतले. वरिल व्याख्यानास पंचक्रोशीतील तरुण, तरुणी महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.