परंडा (प्रतिनिधी)- परंडा भारतीय जनता पार्टीची भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन परंडा तालुका अधयपदी अरविंदबप्पा रगडे यांची तर परंडा शहर अध्यक्षपदी उमाकांत गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
भाजपा परंडा शहर व ग्रामीण मंडल अध्यक्ष निवडीकरिता भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा निवडणूक निरीक्षक श्री. गुरूनाथ मगे व परंडा शहर व ग्रामीण मंडल निवडणूक निरीक्षक श्री. प्रभाकर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. 20 एप्रिल रोजी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. तालुक्यातील वाकडी ग्रामपंचात सदस्य व परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले नवनिर्वाचित परंडा ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे हे यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष होते. भाजपा नेतृत्वाने नवीन तरूण चेहऱ्यास संधी दिली असून ते आतापर्यंतचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. तर परंडा शहर मंडलाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. उमाकांत गोरे हे गेल्या चार महिन्यापासून अध्यक्षपद सांभाळत होते. अनुभवी चेहऱ्यास संधी दिली गेली आहे. रगडे व गोरे यांचा सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर ॲड. गणेशबप्पा खरसडे यांनी कमी काळात वेळ देऊन चांगले कार्य केल्याबद्दल कौतुक केले.
या बैठकीस भाजपा मावळते तालुका अध्यक्ष ॲड. गणेशबप्पा खरसडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, चिटणीस रामकृष्ण घोडके, माजी शहराध्यक्ष संदीप शहा, परंडा न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, तुकाराम हजारे, नागेश शिंदे, रमेश पवार, श्रीराम देवकर, निशिकांत क्षिरसागर, मुकुंद चोबे, नागेश गर्जे, परसराम कोळी, डॉ. अमोल गोफणे, अर्जुन कोलते, रामदास गुडे, जयंत सायकर, सन्नी अहीरे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, मुसळे आप्पा, आदर्श ठाकूर, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, रवी गरड, राहुल फले, राहुल जगताप, ब्रम्हदेव उपासे, साहेबराव पाडुळे, श्रीमंत शेळके, योगेश डांगे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा गायत्रीताई तिवारी, शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.