भूम (प्रतिनिधी)- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव इंदिरानगर अध्यक्षपदी वैभव गायकवाड तर उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती सोहळा साजरा करण्यासाठी  बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी सर्व समाज बांधव भीमसैनिक उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते वैभव गायकवाड यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड यांची निवड करन्यात आली. तसेच खजिनदारपदी दत्ता गायकवाड सचिवपदी सागर इजगज यांची निवड करण्यात आली. यावेळी  अमोल शिंदे, शिवाजी पायाळ, महावीर बनसोडे, लोकेश भालेराव, मुगाजी थोरात, किशोर मस्के, अतुल सीतापे, आनंद सीतापे, नितीन इजगज, वैभव शिंदे, पंचशील गायकवाड, तुषार शिंदे, शुभम पालके, तानाजी पायळ, अंगोली शिंदे, अर्जुन सीतापे, प्रकाश सीतापे, सुहास इजगज, संजय गायकवाड, अनिकेत सावंत, फुलचंद जावळे, सतीश मस्के, अक्षय इजगज ,प्रशांत पायाळ, संकेत सीतापे, सुजल सीतापे यांच्यासह मोठ्या प्रमाणात भिमसैनिक उपस्तित होते.


 
Top