धाराशिव (प्रतिनिधी)- येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक, माध्य व उच्च माध्य विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या  5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या एम. टी. एस. ऑलीम्पियाड स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये  विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

या परीक्षेत विद्यालयातील विश्वदीप आडसकर, येसुराज्ञी कामटे, आरोही राऊत, रुद्रप्रताप कामटे, अवंतिका पाटील, आयुष्य सदाफुले या सहा विद्यार्ध्यांनी जिल्ह्यात पहिल्या दहामध्ये येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर चौदा विध्यार्थ्यानी गोल्ड मेडल, अठरा विद्यार्थ्यांनी सिलव्हर मेडल व वीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रविकांत शितोळे, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख, स्पर्धा परीक्षेतील सर्व शिक्षक, शाळेतील सर्व शिक्षक वृद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top