धाराशिव  (प्रतिनिधी) - पवित्र रमजान ईदनिमित्त ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली. तर मुस्लिम व हिंदू बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत शुभेच्छा शुभेच्छा दि.३१ मार्च रोजी देत ईद साजरा करण्यात आला.

रमजान ईदनिमित्त सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी मस्जिदमध्ये गर्दी केली होती.  सकाळी साडेआठ वाजता मौलाना उबेद यांनी नमाज पठण केले तर मौलाना नूर काझी यांनी प्रवचन दिले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ प्रतापसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, तहसिलदार मृणाल जाधव, धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पार्टीचे मसूद शेख, काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक धनंजय शिंगाडे, मैनोद्दीन पठाण, शिवसेना (ठाकरे) शहराध्यक्ष सोमनाथ गुरव आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमाज नंतर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार सरफराज काजी यांनी मानले.

 
Top