धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे येरमाळा येथील गुरनं 39/2014 कलम 396, 397, 364, 412, 201 सह कलम 3(1), 3(2), 3(4), 3(5) मोक्का व पोस्टे धाराशिव ग्रामीण 58/2014 कलम 395 अशा दोन गुन्ह्यातील वॉरंट मधील आरोपी नामे- बबन आबा शिंदे, रा. पिंपळगाव (क) ता. वाशी जि. धाराशिव ह.मु. कल्पनानगर कळंब हा आरोपी 8 वर्षा पासून वेगवेगळ्या ठिकाणी वेष बदलून राहत होता. तसेच त्याचे वडीलांनी नमुद आरोपी हा मयत झाला आहे. असे न्यायालयात प्रतिज्ञा पत्र सदर केले होते. त्या अनुषंगाने वेगवेगळे पथका मार्फत शोध घेवून ही तो मिळून येत नसल्याने सत्र न्यायालय धाराशिव यांनी पोलीस अधीक्षक यांना सदर आरोपीचे शोध कामी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्याबाबत आदेशित केला. त्यावरुन पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरून दिनांक 01.04.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, अमोल मोरे व पोहे विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, चा.पोह महेबुब अरब व पोअं प्रकाश बोईनवाड, असे रवाना होवून नमुद आरोपीचा कळंब परिसरात शोध घेत असताना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नमुद आरोपी हा डिकसळ येथे आहे. त्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून न्यायालया समक्ष हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, अमोल मोरे व पोह विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, चा.पोह महेबुब अरब व पोअं प्रकाश बोईनवाड, यांच्या पथकाने केली आहे.