तुळजापूर (प्रतिनिध)- येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 चे तत्कालीन मुख्याध्यापक कै. दिगंबरराव किसनराव कावरे गुरुजी यांच्या 21 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा जयश्रीताई कंदले, माजी नगरसेवक सचिन पाटील, अमर हंगरगेकर, विनोद पलंगे, प्रा. सतिश बिडवे, जया सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, युवास्पंदन सामाजिक संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रशांत भागवत, गुणवंत कामगार पुरस्कार विजेते शाहूराज कावरे, आनंद सावंत, ज्योतिबा जाधव, जयमाला वटणे, उज्वला जोशी, स्वाती कावरे, पत्रकार प्रशांत कावरे, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली कावरे, ज्योती बिडवे रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे उपस्थित होते. 

धाराशिव जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालिका जयश्री माळी ढगे व नितीन ढगे या पती-पत्नीने एकत्रित रक्तदान केले.तसेच सात महिलांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूरचे जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे यांचा विशेष कामगिरीबद्दल माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख माजी उपनगराध्यक्ष अमर मगर कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

रक्तदात्यांचा गौरव पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, बबन गावडे, मुख्याध्यापिका ज्योती राऊत, गणेश जळके, डॉ. दाजी रोकडे, उज्वला जोशी, ज्योती बिडवे, जया सुरवसे, इंद्रजीत साळुंखे प्रकाश मगर, रत्नदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता महेंद्र कावरे, शहाजी कावरे, प्रा. डॉ. प्रशांत भागवत, जगदीश पलंगे, निरंजन डाके, रामेश्वर आपुणे, प्रमोद चौधरी, बालाजी कामे,विशाल सूर्यवंशी, सार्थक बिडवे, सार्थक कावरे, स्वराज्य कावरे आदींनी परिश्रम घेतले.


 
Top