तुळजापूर (प्रतिनिधी) -येथे उभारण्यात आलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा रविवार दि. 13 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.

पालकमंञी  प्रताप सरनाईक यांच्याहस्ते तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील सह अन्य मान्यवरांचा उपस्थितीत होणार आहे. तिर्थक्षेञ पूर्वी अर्धाकृती पुतळा होता. आता पुर्णाकृती उभारला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी सुमारे एक कोटी खर्च असुन तो तुळजापूर विकास प्राधिकरणातुन करण्यात आला आहे.


 
Top