तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच 41 अंश सेल्सिअस इतका प्रचंड तापमानाचा पारा वाढला होता. या परिसरात सोलापूरचे तापमान वाढलेले असते. मात्र तुळजापूर येथे तीव्र उन्हाच्या झळा कधी ही बसल्या नव्हत्या. त्यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर सोलापूर झाल्याची भावना व्यक्त होत होती. एप्रिलमध्ये असे तर मे मध्ये कसे अशा विचार लोकांचा मनात येत आहे. मागील काही दिवसा पासुन तुळजापूरचे तापमान 41 अंशांच्या घरात जात आहे. रविवारी ते मंगळवार तापमानाचा पारा 41 अंशांच्या पुढे सरकल्याने तुळजापूरकर सह भाविक अक्षरशः हैराण झाले आहेत. तसेच देविदर्शनार्थ येणारा भाविक वर्ग असाह्य उकाड्याने ञस्त दिसत होता.
या उष्णतेचा तिर्थक्षेञ तुळजापूरचा जनजीवनावर परिणाम झाला असुन शेती कामे सकाळीच उरकुन घेतली जात आहे. दुपारी मंदीर परिसर वगळता इतर रस्ते सुनसान होत असुन शेतशिवारात शुकशुकाट जाणवत आहे. उष्णते पासुन सुटकेसाठी लोक थंडपेय दुकानावर गर्दी करीत आहेत. थंडपेय बाटल्यांचा विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे. सकाळपासूनच उन्हाची अधिक तीव्रता जाणवत होती. दुपारी प्रचंड उष्म्याने अंगाची लाही लाही होऊन भाविक नागरिक कासावीस झाले होते. त्यातच वारा न सुटल्याने उष्णतेमुळे नागरिक, भाविक आणखी हैराण होत होते. यंदाच्या उन्हाळ्यात होळीच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारीपासून तिर्थक्षेञ तुळजापूर तापमान वाढत आहे. चालू एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा उत्तरोत्तर वाढत असल्यामुळे सूर्यनारायण कोपले की काय, अशी चिंता वाढविणारी स्थिती दिसून येते. या तापमानामुळे तुळजापूरची वाटचाल सोलापूरच्या दिशेने होत असल्याचे म्हटले जात आहे.
शुक्रवारी गूड फ्रायडे, शनिवार, रविवार शासकीय सुट्यामुळे भाविकांची मोठी गर्दी झाली होते. भाविक दर्शन घेवुन आल्यानंतर घामाने चिंब भिजुन जात होते. मंदीर परिसरात उन्हा पासुन संरक्षण करणारी उपाययोजना केल्याने भाविकांना मंदीरात काही कालावधी करीता असाह्य उष्णते पासुन दिलासा मिळत होता. शहरात माञ वृक्ष नसल्याने भाविकांना असाह्य उष्णतेचा ञास सहन करावा लागत होता. काही भाविक उष्णते पासुन सुटका मिळावी म्हणून पहाटे देवीदर्शनार्थ मंदीरात गर्दी करीत आहेत.