परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील कल्याणसागर समुहातील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी विवेक विश्वनाथ ऐतवाडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागात वैज्ञानिक सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. विवेक ऐतवाडे यांनी कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची संवाद या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली असता ठाकूर यांनी त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी विवेक यांचे वडील विश्वनाथ ऐतवाडे उपस्थित होते.

 
Top