राजा वैद्य

धाराशिव- धाराशिव जिल्ह्याची पावसाची सरासरी 770.7 मिमी आहे. 1 जून 2024 ते 23 एप्रिल 2025 पर्यंत जिल्ह्यात सरासरी 801.38 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मे महिन्यात जिल्ह्याला म्हणावी तशी पाणी टंचाई जानवली नाही. जिल्ह्यातील 226 सिंचन प्रकल्पात 23.86 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 


तालुकावाईज सिंचन प्रकल्प

जिल्ह्यात परंडा तालुक्यात एकमेव मोठा सिनाकोळेगाव सिंचन प्रकल्प आहे. तर 17 मध्यम प्रकल्पापैकी धाराशिव 3, कळंब 1, भूम 3, परंडा 4, तुळजापूर 3, उमरगा 3 या प्रमाणे एकूण 17 मध्यम प्रकल्प आहेत. लघू व साठवण तलाव जिल्ह्यात 208 आहेत. त्यापैकी धाराशिव तालुक्यात 41, कळंब तालुक्यात 16, भूम तालुक्यात 16, परंडा तालुक्यात 10, वाशी तालुक्यात 14, तुळजापूर तालुक्यात 68, उमरगा तालुक्यात 35 तर लोहारा तालुक्यात 8 आहेत. 


उपयुक्त पाणीसाठा 

17 मध्यम सिंचन प्रकल्प व 208 लघु सिंचन साठवण तलाव आहेत. गेल्या आठवड्यात 26.89 टक्के उपयुक्त पाणीसाठा सर्व प्रकल्पात होता. परंतु या आठवड्यात 23.86 टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे. मोठ्या सिंचन प्रकल्पामध्ये 25 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. 17 मध्यम सिंचन प्रकल्पापैकी एका प्रकल्पात 51 ते 75 टक्के पेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तर 10 प्रकल्पामध्ये 26 ते 50 टक्के पेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तर 3 प्रकल्पामध्ये 25 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. 2 प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली असून, एक प्रकल्प कोरडा पडला आहे. तर 208 लघू सिंचन साठवण तलावापैकी 1 शंभर टक्के भरलेला असून, 2 साठवण तलावामध्ये 75 टक्के पेक्षा जास्त उपलब्ध पाणीसाठा आहे. 7 साठवण तलावामध्ये 51 टक्के 75 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. 26 ते 50 टक्के कमी उपयुक्त पाणीसाठा असलेले 65 साठवण तलाव आहेत. तर 25 टक्के पेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा असलेले 71 साठवण तलाव आहेत. तर 55 साठवण तलावामध्ये जोत्याच्याखाली उपयुक्त पाणीसाठा गेला आहे. 7 साठवण तलाव कोरडे पडले आहेत. 


पाच वर्षात 1.39 मीटर पाणी पातळीत वाढ

भू जल सर्व्हेक्षण विभागाने धारशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण 114 विहींरचे निरीक्षण केले आहे. गेल्या पाच वर्षातील मार्च महिन्यातील सरासरी पाणी पातळी पाहिल्यास 9.11 मीटर पाणी पातळी होती. मार्च 2025 मध्ये केलेल्या पाहणीत ही पाणी पातळी 7.73 मीटरवर आली आहे.  गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात राबविलेल्या जल सिंचनाच्या विविध योजना यामुळे पाणीपातळीत वाढ झाल्याचे मानले जात आहे. त्याप्रमाणे गेल्या 2- 3 वर्षात पावसाने ही आपली सरासरी ओलांडली आहे. जून 2024 ते एप्रिल 2025 पर्यंतची पावसाची आकडेवारी पाहिल्यास 103.98 टक्के पाऊस झाला आहे. 

 
Top