कळंब (प्रतिनिधी)- विद्याभवन हायस्कूल, कळंब या प्रशालेत सामाजिक वनीकरण विभाग धाराशिव, वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण कळंब आयोजित 21 मार्च जागतिक वन दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध लेखनाचा विषय ' वनाचे महत्व' या विषयावर प्रशालीतील विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले. या स्पर्धेत एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय ,तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी व्ही के करे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण धाराशिव, बी एम तळेकर वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण कळंब ,एस आर कुलकर्णी वनपाल कळंब प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही जी उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी ,मराठी विभाग प्रमुख सोपान पवार या मान्यवरांच्या हस्ते कु. मृणाल संतोष पवळ प्रथम क्रमांक, कु.रिया महेश आडणे द्वितीय क्रमांक, कु. वैष्णवी विष्णू तांबारे तृतीय क्रमांक व  कु .प्रणिता गुणवंत जाधव उत्तेजनार्थ या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मराठी विभाग प्रमुख सोपान पवार यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच एस आर कुलकर्णी वनपाल कळंब यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड कशी करावी,वनाचे महत्त्व व वृक्ष संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाप्रसंगी ज्योतीराम सोनके अप्पासाहेब वाघमोडे दीपक सौलाखे  संजय कदम, चंद्रकांत शेवाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठी विभाग प्रमुख सोपान पवार यांनी मानले.

 
Top