भूम (प्रतिनिधी)- डॉ. राहुल घुले यांनी भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांची त्यांचे दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री गणेशाची मूर्ती उपराष्ट्रपती यांनी प्रेम पूर्वक सदिच्छा भेट म्हणून दिली व त्यांचा सत्कार केला. 

देशपातळीवर परवडणाऱ्या स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून एक प्रस्ताव त्यांनी उपराष्ट्रपती यांना दिला. तसेच राजकीय व सामाजिक विविध विषयावर यावेळी त्यांनी चर्चा केली. डॉ. राहुल घुले हे वन रुपी क्लिनिक चे संस्थापक असून भूम परंडा वाशी या तिन्ही तालुक्यात गेल्या 2 वर्षात त्यांनी अनेक रुग्णांवर मोफत ईलाज केले आहेत व वेळप्रसंगी त्यांचे ऑपरेशन देखील मोफत केले आहेत. त्यांनी हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डीपी दुरुस्त करून पोहोच करण्याचे काम केले आहे. मुंबई सह देशभरात त्यांचे वन रुपी क्लिनिक चे कार्य सुरू असून त्याची व्याप्ती सर्वसामान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जात आहे.


 
Top