कळंब (प्रतिनिधी)- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त कळंब शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चित्रकला स्पर्धे साठी दोन गट केले असून पहिला गट  ते 5 वी आणि दुसरा गट 6 वी ते 10 वी असे आहेत. प्रत्येक गटातून प्रथम पारितोषिक 3000, द्वितीय 2000, त्रितीय 1000 व उत्तेजनार्थ तिघांना प्रत्येकी 200 असे  ठेवण्यात आले आहे. 

निबंध स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहेत. निबंधाचा विषय “ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य“ हा असुन पहिला गट 5 वी ते 7 वी आणि दुसरा गट 8 वी ते 10 वी असा आहे. पहिल्या गटासाठी शब्द मर्यादा 1000 व दुसऱ्या गटासाठी 1500 शब्द मर्यादा अशी आहे. प्रत्येक गटातून प्रथम पारितोषिक 3000, द्वितीय 2000, त्रतिय 1000आणि उत्तेजनार्थ म्हणून तीघांना प्रत्येकी 200 असे ठेवले आहेत. 

चित्रकलेसाठी चित्र रेखाटलेला आर्ट पेपर मोफत पुरविण्यात येणार असून पेन, पॅड, पेन्सिल, रंगाचे साहित्य स्पर्धकांनी सोबत आणायचे आहे. निबंध लिहिण्यासाठी पेपर स्पर्धकांनी सोबत घेऊन यायचा आहे व निबंध शाळेत ठरवुन दिलेल्या वेळेत पूर्ण करायचा आहे. संयोजकांचा निर्णय अंतिम राहील. 

चित्रकला स्पर्धा मंगळवार दि 22 एप्रिल 2025 रोजी त्या त्या शाळेत सकाळच्या सत्रात घेतली जाणार आहे. निबंध स्पर्धा शाळेच्या सोयीनुसार 23 त 28 एप्रिल म्हणजेच शाळेला उन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी घेण्यात येईल.

या स्पर्धां एका विशिष्ट ठिकाणी न घेता वाढते तापमान व चालू असलेल्या शालेय अंतर्गत परिक्षा याचा विचार करून त्या त्या शाळेत आयोजित केलेल्या आहेत. संयोजकांनी या स्पर्धेविषयी माहिती सर्व शाळांना दिलेली आहेच परंतु नजर चुकीने एखाद्या शाळेला माहिती मिळाली नसेल तर पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा व स्पर्धेत विद्यार्थ्यांना सामिल करून घ्यावे हि विनंती.  अप्पासाहेब कसपटे सर 9595180412, नानासाहेब कवडे सर 9404677147, अप्पासाहेब वाघमोडे सर, डॉ अशोक शिंपले सर, 7038289599, सचिन सलगर सर 9423736155, प्रा डॉ दादाराव गुंडरे सर 9470054913 आणि गाडेकर मॅडम 9405501045. असे संयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. बक्षीस वितरण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी म्हणजे शनिवार दि 31 मे 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते समारंभ पुर्वक  करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

 
Top