धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न, संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध जाती धर्मातील पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले.

या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष धनंजय नाना शिंगाडे, मुकुंद घुले, विशाल शिंगाडे, पप्पू ऊर्फ संजय मुंडे, खलील सय्यद, रवि कोरे आळणीकर, लक्ष्मण माने, नाना घाडगे, पांडू भोसले, कृष्णा भोसले, आबा सुर्यवंशी, सुरेश गवळी, अनिरुध्द कावळे यांच्या समवेत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होत बाबासाहेबांचे कार्य आणि विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. शोषित, वंचित, दलित, गरीब, श्रमिक वर्गाला न्याय मिळवून देणाऱ्या आणि एक नवभारत घडविण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या महामानवाच्या विचारांची आज अधिक गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त  करण्यात आली.

 
Top