धाराशिव (प्रतिनिधी)-समता नगर येथे, धाराशिव नगरपरिषदेकडून स्थापन करण्यात आलेल्या 'शहर उपजिविका कृती आराखडा समिती' मध्ये  गणेश वाघमारे यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पर्यटन जनजागृती संस्था संचलित पर्यटन विकास समिती धाराशिव यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

गणेश वाघमारे हे संविधान संवाद समितीच्या माध्यमातून धाराशिव शहराला पुर्व परिचित आहेतच. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, त्यांना नगर परिषद धाराशिव, यांनी, नव्याने स्थापन केलेल्या शहर उपजिविका कृती आराखडा समिती मध्ये 'सामाजिक संस्था प्रतिनिधी' या पदी नियुक्त केले आहे.

सदर समितीच्या माध्यमातून विविध सरकारी गृहनिर्माण योजनांची माहिती व फायदा प्रत्येक सामाजिक घटकाला व्हावा याकरिता तसेच, बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी विशेष प्रयत्न अपेक्षित आहेत.

या निवडीबद्दल गणेश वाघमारे यांना डॉ. अभय शहापूरकर,  राजेंद्र अत्रे, माजी नगरसेवक  युवराज (बप्पा) नळे, भागवत घेवारे,  रणजित रणदिवे, रविंद्र शिंदे या सर्वांनी सत्कार करून, आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रा अभिमान हंगरगेकर, कलाध्यापक शेषनाथ वाघ, अविनाश मुंडे, कृष्णा साळुंके, बाबासाहेब गुळीग, राजाभाऊ कारंडे  उपस्थित होते.  

 
Top