धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीमती सुशिलादेवी साळुंखे अध्यापक महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांचा महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे यांना नुकतीच अमेरिका विद्यापीठाची डिलीट मिळालेली आहे . त्याचबरोबर त्यांची  चालू शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर या अभ्यासक्रमावर आधारित दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि नुकतीच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून नगर परिषदेमार्फत नेमण्यात आलेल्या फोर्स टास्क समितीवर  त्यांची नेमणूक झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे म्हणाले की,डॉ. लोंढे यांनी आतापर्यंत 32 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. अनेक संशोधन पर लेख त्यांनी लिहिलेले आहेत.आकाशवाणीवर आणि प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन अनेक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी गरुड झेप कमी वयात  त्यांनी घेतलेली आहे. आणि यापुढे देखील त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी परीक्षा विभाग प्रमुख प्रो .डॉ.रत्नाकर मस्के, डॉ.निशांत निर्मळे,डॉ. अनिल पाटील, प्रा. केतन गायकवाड, प्रा. बंडू ननवरे, प्रो. डॉ. केशव क्षीरसागर ,श्री सतिश काकडे, श्रीमती गायकवाड उपस्थित होते.

सत्काराबद्दल प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे म्हणाले की, आपण केलेला हा सत्कार ,आपला आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. या सत्कारामुळे माझी ऊर्जा द्विगुणीत झाली त्याबद्दल डॉ. लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले.

 
Top