धाराशिव (प्रतिनिधी) - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून धाराशिव शहरातील एक तेरा सात ग्रुपच्या शेकडो सदस्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. या ग्रुपचे संस्थापक शौकत भाई शेख, अध्यक्ष  अहेमद कुरेशी, अलीम पठाण, फिरोज मुजावर, पप्पू खुने, बबलू शेख, जहीर कुरेशी, अस्लम कुरेशी, मुजाहिद कुरेशी यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

धाराशिव येथील वैराग नाका येथील एक तेरा सात ग्रुपच्या संपर्क कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात प्रवेश केलेल्यांना नियुक्त्या दिल्या आहेत. यामध्ये शौकत शेख यांची अल्पसंख्याक विभागाच्या कळंब-धाराशिव विधानसभा अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अलीम पठाण यांची तसेच सरचिटणीसपदी मकबूल टकारी यांची व शहर चिटणीसपदी अय्याज पठाण यांची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नितीन काळे, मधुकर तावडे, दत्ताभाऊ कुलकर्णी, अमित शिंदे, निहाल काझी, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, खंडेराव चौरे, दुर्गा पवार, अक्षय ढोबळे, राणा बनसोडे, दत्ता पेठे, बापू पवार, सुजित साळुंखे, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, अरुण पेठे, पटेल, प्रसाद मुंडे, किरण येडके, नवा आप्पा डोंगरे, पप्पू खुळे, अशोक नागटिळक, गफ्फार शेख, रंजीत येडके, अफजल कुरेशी, रोहित झोंबाडे, झहीर कुरेशी, आरेफ सौदागर, महादू थोरात, खलील सौदागर, अमीर सौदागर, सत्तार शेख, फकीर सौदागर, बाळू बनसोडे, मुजाहिद कुरेशी, मुजफिर कुरेशी, आवेज शेख, फिरोज मुजावर, फारूक शेख, संघरत्न सुर्यवंशी, फिरोज भाई, बबलू शेख, अरुण मिस्त्री, साबिर पठाण, समीर शेख यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top