धाराशिव (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या धाराशिव शहराध्यक्षपदी फरमान आबुल फताह काझी यांची दि.२८ फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली आहे.
धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते फरमान काझी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मतिन पटेल, सतिश दंडनाईक, निहाल काझी, पुष्पकांत माळाळे, अमित शिंदे, अक्षय ढोबळे, यशवंत जाधव, युवराज नळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.