भूम (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पत संस्था भूमच्या सार्वत्रिक निवडणूकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रणित शिक्षक सेवा सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. येथील रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल समर्थ नगर येथे दिनांक 23 मार्च रोजी निवडणूक पार पडली. यासाठी एकुण 231 मतदार होते .त्यापैकी 206 मतदान झाले. या निवडणुकीत 8 जागेसाठी 16 उमेदवार रिंगणात होते .एकूण या पतसंस्थेच्या 13 जागा असून त्यातील 5 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. 8 जागेसाठी निवडणूक पार पडली.

शिक्षक सेवा सहकारी पॅनल च्या पाच जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्याने नंतरच्या आठ ही जागावर त्यांचेच पॅनलचे वर्चस्व राहिले .यामध्ये बिनविरोध निवडून आलेले लक्ष्मी कल्याण इंगळे -गुंजाळ, स्मिता सुभाष जंजिरे - ढगे, दीपक प्रकाश वाळके, श्रीपाद रघुनाथ कुंभार, दत्तात्रय भीमराव घुले तर निवडून विजयी झालेले उमेदवार आरेकर गोकुळ भरत ,टकले सोमनाथ आश्रू,बुरंगे किशोर कुमार नवनाथ ,मिसाळ अंगद एकनाथ ,मुळे अच्युत रामचंद्र ,मुळे जयश्री अभिमान ,सोने रंणजीत अंबादास ,हांगे श्रीराम पांडुरंग हे सर्व उमेदवार निवडून विजयी झाले आहेत .विजय उमेदवाराचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी अभिनंदन केले.भूम तालुक्यातील शिक्षकांची कामधेनू म्हणून ओळखले जाणारी ही पतसंस्था पुन्हा सोमनाथ टकले यांच्या ताब्यात आल्याने मतदारातून समाधान व्यक्त होत आहे.

 
Top