धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक कविता दिना निमित्त, अ.भा साहित्य परिषद पुरस्कृत, साहित्य भारती, शाखा धाराशिव यांच्या वतीने, मार्च रोजी, कवितेची मैफिल पार पडली.
सदर काव्य मैफिल, धाराशिव येथील प्रसिद्ध बालकवी श्री. समाधान शिकेतोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी डॉ. अभय शहापूरकर व शेषनाथ वाघ यांची विशेष उपस्थिती होती. या मैफिलीत ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे, सुप्रसिद्ध गझलकार भागवत घेवारे, साहित्यिक रविंद्र शिंदे, गझलकार युवराज नळे, धाराशिव येथील स्थापत्य अभियंता रणजित रणदिवे, तसेच युवा कवी अविनाश मुंढे, कृष्णा साळुंके यांनी सहभाग घेतला.
या छोटेखानी मैफिलीत जागतिक कविता दिना निमित्त मराठी-हिंदी-ऊर्दू अशा त्रैभाषिक कवितांचं वाचन आणि सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी कवितेला उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप बालकवी समाधान शिकेतोड यांच्या 'शास्त्रज्ञ' या कवितेने झाला. आभार प्रदर्शन बाबासाहेब गुळीग यांनी केले.