उमरगा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने विविध प्रश्नांसाठी 'लालमहल, पुणे ते विधानभवन, मुंबई' या मार्गावर प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली 15 ते 19 मार्च या कालावधीत पदयात्रा काढण्यात येणार आहे. तर 19 मार्च रोजी हजारो कार्यकर्ते विधान भवनाला घेराव घालणार आहे.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब व प्रभारी अजय छिकारा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, राज्याचे सहप्रभारी कुमार रोहित, एहसान खान सहभागी असतील. पुणे  येथील लालमहल पासून शनिवारी, (दि 15) पदयात्रेची सुरवात होईल. विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथालायांचा सहभाग असणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा संघटन प्रमुख श्रीनिवास नालमवार नाही यांनी दिली. महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर वाढत असून, रोजगाराच्या संधी कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार, राजकीय गुन्हेगारी प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येत असून गुन्हेगारांना अनेकदा सत्ताधारी नपक्षांकडून संरक्षण मिळत असल्याचे महाराष्ट्राने बघितले आहे. समाजातील विभाजन आणि विरोधाभास अधिकाधिक प्रकट होत आहे. या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांनी केले.


 
Top