धाराशिव (प्रतिनिधी)- निमा वुमन्स फोरम,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव वज्ञानदा सामजिक बहुउद्देशीय संस्था धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त लेणी रोड, पिवळी टाकी, बोंबले हनुमान रोड, धाराशिव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी तसेच ब्रेस्ट चेक अप शिबिर आयोजित केले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंकज शिनगारे  डॉ. मयूर देशमुख, डॉ.मनिषा जाधव मॅडम, डॉ. क्रांती भिसे मॅडम, डॉ. शितल कोपर्डे मॅडम, डॉ. वैशाली बलवंडे, डॉ. सरोदे मॅडम, पानसे मॅडम, काळे मॅडम उपस्थित होते.असे व्यासपीठावर आज वैद्यकीय क्षेत्रातील,पोलीस खात्यातील त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील आणि न्याय शास्त्रज्ञ असे विविध क्षेत्रातील तज्ञ व्यासपीठावर उपस्थित होते.तरनिमा वुमन्स फोरमच्या डॉ. अस्मिता बुरगुटे मॅडम, डॉ.शेलार मॅडम, डॉ. प्रमिला शिनगारे या उपस्थित होत्या. ज्ञानदा सामाजिक बहुउद्देशीय संस्था.. अध्यक्षा सगुना आचार्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या तर युवराज सिंग फाउंडेशनच्या वतीने तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. साधारण 45 ते 50 महिलांची स्तनांची तपासणी यावेळी करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने निमा वुमन्स फोरम व ज्ञानदा बहुउद्देशीय संस्था यांनी पुढाकार घेतला.यावेळी विशेष करून इंडिया टीव्हीच्या पत्रकार सौ.काळे मॅडम यांची खूप मदत झाली..या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. दिपाली पुलकंठे या पीजी विद्यार्थिनीने केले.

यावेळी प्रास्ताविक करत असताना निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्ष डॉ.सौ.अस्मिता बुरगुटे म्हणाल्या की निमा वुमन्स फोरम नेहमीच सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे.

तर ज्ञानदा संस्थेच्या सगुना आचार्य म्हणाल्या की अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना आरोग्यविषयक उपक्रम स्त्रियांसाठी राबवण्याची माझी खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली. डॉ. मयूर देशमुख सरांनी महिलांना आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन केलं. तर डॉ. पंकज शिनगारे यांनी महिलांनी आपले अधिकार ओळखून आपले अस्तित्व आणि महत्त्व जाणले पाहिजे असे आवाहन केले. तर निमा फोरमच्या माजी अध्यक्षा डॉ.मनीषा जाधव यांनी महिलांनी सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आव्हान यावेळेस केले.

यावेळेस 150 ते 200  महिला कार्यक्रमा साठी  उपस्थित होत्या. यात 150 रुग्णाची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी केली गेली. यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे माननीय अधिष्ठाता डॉ गंगासागरे सर यांनी सर्व औषधी उपलब्ध करून दिली व हे शिबिर घेण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. राजश्री गाडेकर डॉ. दिपाली पुलकंठे डॉ. पायल राठोड डॉ. शिवालिका संगेकर डॉ.भाग्यश्री पाटील डॉ. श्रुतिका व्यवहारे डॉ. विजयालक्ष्मी हिंगमिरे डॉ. पुष्पा सोळुंके डॉ. धनश्री पाखरे डॉ. नेहा बोरकुटे या लाभल्या होत्या. यावेळी डॉ.भाग्यश्री पाटील या  विद्यार्थिनीने  कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन करून सांगता केली.

 
Top