धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील सोनेगाव येथील लक्ष्मण मोरे यांचे चिरंजीव योगेश लक्ष्मण मोरे यांची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड झाली आहे. याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, राजेंद्र जाधव, मेहबूब पटेल, मुन्ना इंगळे, दादा पाटील, बापूजी शेळके आदींची उपस्थिती होती.